dr.satish best web design developer for mac

नरेवाडी ग्रामपंचायत :

कोल्हापूर जिल्हातील गडहिंग्लज तालुक्यापासून पुर्वेकडे 15 कि.मी. अंतरावर व किल्ले सामानगडच्या पायथ्याशी वसलेले आमचे मौजे नरेवाडी गाव. गावची लोकसंख्या 1525 आहे. श्री.रामलिंग मंदिर हे गावचे ग्रामदैवत असुन हे मंदिर लोकवर्गणीतुन बांधलेले आहे. निसर्गाच्या रम्य परिसरात आमचं गाव वसलं आहे. गावच्या आजूबाजूला उंच झाडं, त्यावर पक्ष्यांचा किलबिलाट, वार्‍यामुळे होणारी पानांची सळसळ, पावसात अंगणातून वाहत जाणारं पाणी, सुसाट वार्‍यामुळे डोलणारी झाडं, मध्येच कुत्र्याचं भुंकणं, गाईंचं हंबरण आणि कोंबड्याची बांग, मंदिरातील घंटानाद आणि येथील जीवाला जीव देणारी माणसं. गावची एकूण लोकसंख्या 1525 आहे गावामध्ये 697 घरे असून ती 454 कुटुंबात वास्तव्य करतात. गावाचे पोस्ट ऑफिस गावामध्येच असल्याने गावातूनच पत्रव्यवहार केले जातात.

ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

आमच्या गावच्या ग्रामपंचायतीची स्थापना 1957 साली झाली आहे. गावची निवडणूक ही दर पाच वर्षानी होते. ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी गावचा प्रथम नागरीक म्हणून सरपंच व इतर सहा सदस्यांची गावातील नागरिकांच्या एकमताने नेमणूक केली आहे. मौजे ग्रामपंचायत नरेवाडी यांच्या मार्फत 2 कोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत 1 जुलै 2016 रोजी गावामध्ये वृक्षलागवड करण्यात आली आहे.

सरपंच
सौ. चंद्राबाई तुकाराम निलवे

गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.

उपसरपंच
श्री. रामचंद्र गणू पाटील

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
श्री एस. एम. गबरे

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

आपली समस्या,विचार व विकास मांडा.

आम्ही 'ज्ञानग्रुप' आपली समस्या किंवा विचार थेट जिल्हा परिषद कोल्हापूर पर्यंत पोचवु...!

Gadhinglaj City- Kolhapur Maharashtra

ADDRESS
Narewadi Grampanchayat
A/P - Narewadi Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416506

CONTACTS
Phone :

Office : 02327 – 231159